godavari river flood Nashik : गोदावरीला पूर; ड्रोनने टिपलेली दृश्य |Aerial | Drone view |Sakal Media
नाशिक - गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर सुरू असून धरणातून पाण्याच्या विसर्गामुळे नाशिकमध्ये गोदावरीला पूर आला आहे.(godavari river flood in nashik) गंगापूर धरणातून यंदाच्या हंगामातील उच्चांकी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात 4 हजार 009 क्यूसेक वेगानं पाणी सोडलं. (godavari river flood video)रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पाण्याखाली गेला असून गोदा घाटाशेजारील रस्त्यावरही पुराचं पाणी आले आहे. (godavari river flood in nashik)घाटावरील छोट्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यावसायिकांची तारांबळ पाहायला मिळत आहे. गोदावरी नदीच्या पुराचा ड्रोन व्हिडिओ टिपलाय प्रसिद्ध छायाचित्रकार राज चौधरी यांनी.
#godavaririverfloodtoday #godavaririverflood #godavaririver #flood #Nashik #godavaririverdroneview #Droneview #aerial #NashikRain